होटेल-यादी,यात्रा कंपनी, स्थळांची माहिती
शोधण्यासाठी पर्याय निवडा.
स्थळाचे नाव इंग्रजीत टाईप करा .
  

तिरुपती (आंध्र प्रदेश)

या ठिकाणचे फोटो सद्ध्या उपलब्ध नाहीत. या ठिकाणचे सुन्दर फोटो आपल्याकडे असल्यास तुम्ही ते आम्हाला पाठवू शकता. संपर्क .

काय पाहायचे?

हे ठिकाण जरी आंध्र प्रदेशात येत असले तरी जसे कर्नाटक सहलीमध्येच उटीचा समावेश केला जातो त्याप्रमाणेच मद्रासच्या सहलीमध्ये तिरुपती बालाजी हे ठिकाण पाहिले जाते.
तिरुपती बालाजी किंवा श्री व्यंकटेश्वर पेरूमल मंदिर हे या ठिकाणचे प्रमुख आकषर्ण आहे. भारतातील हजारो यात्रेकरू या ठिकाणाला दरवर्षी भेट देतात. हे मंदिर शहरापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर असलेल्या तिरुमलाई डोंगरावर आहे. रेणीगुंठा स्टेशनपासून तसेच मद्रासपासून तिरुमलाई डोंगराच्या माथ्यापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध आहे. भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुपतीचा उल्लेख केला जातो. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे शिव आणि विष्णू यांचे भक्त (शैव आणि वैष्णव) या ठिकाणाला भेट देतात. डोंगराच्या पायथ्याला कपिलतीर्थ नावाचे ठिकाण असून भाविक लोक या ठिकाणी स्नान करून तिरुपतीच्या दर्शनासाठी जातात. डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ताही तयार केलेला आहे. या प्रदेशात एकूण ७ महत्वाच्या टेकड्या आहेत व प्रत्येक टेकडीवर मंदिरे बांधण्यात आली आहेत. मुख्य देवळाच्या परिसरामध्ये श्री गोंवंदराज स्वामी आणि श्री राम स्वामी यांच्या समाध्या आहेत. तिरुपती गावामध्ये तिरुपती विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. (एस. व्ही. युनिव्हर्सिटी) मुख्य शहरापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर चंद्रगिरी टेकडीवर विजयानगरच्या राजानी बांधलेले दोन राजवाडे आहेत. त्यामधील राजमहाल या इमारतीमध्ये सध्या सरकारी विश्रामधाम चालविले जाते. तिरुपतीपासून ४८ कि.मी. अंतरावर मोटारने कालाहस्ती या ठिकाणी जाता येते. येथे सुवर्णमुखी नदीच्या तीरावर शिवाचे मंदिर आहे. धार्मिक दृष्ट्या हे महत्वाचे केंद्र आहे. या मूर्तीला कोणीही स्पर्श करत नाहीत. या ठिकाणी पूजेसाठी नाग आणि हत्ती रोज येतात अशी दंतकथा आहे.

जायचे कसे?

जवळचे रेल्वेस्टेशनः मुंबई-पुणे-हैद्राबाद-मद्रास रेल्वे मार्गावरील ‘रेणीगुंठा’ स्टेशनवर उतरून १२ कि.मी. अंतरावरील तिरुमलाई डोंगरावर मोटारने किंवा पायी पोचता येते. गुडुर स्टेशन १०० कि.मी. मुंबईहून ११५२,  पुण्याहून ९६१, मद्रासहून १४७ .
मोटारनेः मद्रास १४९, बंगलोर २५०, हैद्राबाद ७०४. 
 
Pravasi Vishva is a online version of the formally know publication, "Pravsi Diary" which has been published over last 40 Years. Containt published on Pravasi Vishva is copyrighted to Mr. Jayant Joshi and Pravasi Diary - Disclaimer
 
designed and developed by ideaclay