होटेल-यादी,यात्रा कंपनी, स्थळांची माहिती
शोधण्यासाठी पर्याय निवडा.
स्थळाचे नाव इंग्रजीत टाईप करा .
  

सिमलाः (हिमाचल प्रदेश)

या ठिकाणचे फोटो सद्ध्या उपलब्ध नाहीत. या ठिकाणचे सुन्दर फोटो आपल्याकडे असल्यास तुम्ही ते आम्हाला पाठवू शकता. संपर्क .

काय पाहायचे?

हिमाचल प्रदेशचे राजधानीचे ठिकाण. हे ब्रिटीशांच्या काळापासून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. (उंची २२०६ मीटर्स) येथील माल रोड, सिमला चर्च, लक्कड बाजार, जाखू हिल, संक टमोचन व तारादेवी मंदिर, ग्लेन, प्रॉसपेक्ट किंवा समरहील ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. समरहीलवर राष्ट्रपती भवन बांधण्यात आले आहे. २० कि.मी. वर कुफ्री येथे बर्फावरचे खेळ, पहाडी वेशात फोटो काढणे घोडे /याकवर स्वारी करता येते. संग्रहालयात कांगडा पेंटींग्ज पहावयास मिळतात. तटटपाणी येथे आपण गरम पाण्याच्या झऱ्यात आंघोळीचा आनंद लुटू शक तो.

सिमला येथील मॉल रोड आणी इतर अंतर्गत रास्त्यांवर वाहने नेण्यास बंदी असून कूलींच्या मदतीने सामान होटेल पर्यंत न्यावे लागते आणि स्थलदर्शनासाठी चढउतारांवरून पायी चालण्यची तयारी ठेवावी लागते.
सुमारे १५ कि.मी. अंतरावर नालदेरा हे ठिकाण आहे. त्याठिकाणी गोल्फ, क्रिकेट, रेसेस, फुटबॉल इत्यादी खेळांची मैदाने तयार केलेली आहेत. ८ कि.मी. अंतरावर वाईल्ड फ्लॉवर हिल आणि माशोब्रा ही ठिकाणे आहेत. १.५ कि.मी. अंतरावर असलेल्या जाखू या सर्वोच्च टेकडीवर हनुमानाचे मंदिर आहे. येथे आपल्याकडील वस्तू माकडे पळवून नेण्याची शकयता असते.रस्ता अवघड चढणीचा असून मोटारीत जास्त माणसे बसवू नयेत. याशिवाय नरुरुंडा या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. ६५ कि.मी. अंतरावरील या ठिकाणापर्यंत थेट बस सेवा आहे. तेथे सफरचंद आणि आक्रोडच्या बागा आहेत. छैल येथे जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान आहे. टासेचकौसाली हे ठिकण तेथील शुथ्द हवेसाठी प्रसिध्द आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये स्केंटंगचा आनंद उपभोगता येतो. तसेच स्कीईंगसाठी जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये येथे स्कीट्‌स आणि बोटी भाड्याने मिळतात.

ज्वालामुखीः ५१ शक्तीपीठांपैकी एक  शक्तीपीठ.दिल्लीपासून ४७३ कि मी आणि शिमल्यापासून २१२ कि.मी.

जायचे कसे?

विमानानेः दिल्ली-सिमला जॅगसन एअर-लाईन. दिवसाआड सेवा. चंदीगडला विमानाने जाऊन तेथून १०३ कि.मी. अंतरावर सिमला येथे जाता येते.
रेल्वेनेः दिल्लीहून कालका रेल्वे स्टेशन ( ७ तास) तेथून छोट्या रेल्वेने (९६ कि.मी.) सिमल्याला जाता येते. दिल्ली-कालका ३३०.
मोटारनेः कालका-धर्मपूर-सोलनमार्गे सिमला ९०.  कुल्लू २८० (१० तास), मनाली ३२०.
 
Pravasi Vishva is a online version of the formally know publication, "Pravsi Diary" which has been published over last 40 Years. Containt published on Pravasi Vishva is copyrighted to Mr. Jayant Joshi and Pravasi Diary - Disclaimer
 
designed and developed by ideaclay