होटेल-यादी,यात्रा कंपनी, स्थळांची माहिती
शोधण्यासाठी पर्याय निवडा.
स्थळाचे नाव इंग्रजीत टाईप करा .
  

अमरनाथः (जम्मू कश्मीर)

या ठिकाणचे फोटो सद्ध्या उपलब्ध नाहीत. या ठिकाणचे सुन्दर फोटो आपल्याकडे असल्यास तुम्ही ते आम्हाला पाठवू शकता. संपर्क .

काय पाहायचे?

भगवान शिवशंकराने माता पार्वतीला 'अमर कथा' (अमरत्वाचे रहस्य) सांगण्या साठी निवडलेली ही एकांतातील गुंफा आहे. माता पार्वतीने भोले शंकराच्या गळयातील रूण्ड मालेबद्दल विचारता शंकरांनी सांगितले की ज्यावेळेस पार्वती नवा जन्म घेते त्या वेळेस त्यांच्या रूण्ड मालेमधे एका मुंडाची भर पडते. त्यावर मी पुन्हा पुन्हा जन्म घेते पण तुम्ही अमर कसे? असा प्रश्न पार्वती मातेने विचारल्यावर खूप प्रतीक्षे नंतर तिला अमरत्वाचे रहास्य सांगयचे मान्य करून त्या साठी पूर्ण एकांतातील ही अमरनाथ गुहेची जागा निवडली. तिथे जाताना पहालगांव (बैल गांव) नंदीला सोडले. चंदनवाडीला चंद्र तर शेषनाग तलावाच्या काठावर नागाला सोडले. महागुणास पर्वतावर गणेशाला तर पंजितारणी येथे पंचमहाभूतांना सोडले. त्यानंतर ऐहिक जगाचा त्याग स्वरूप त्यांनी पार्वती मातेसह तांडव केले आणि अमरनाथ गुहेत मृगार्जिनावर समाधिस्थ झाले. त्यानंतर अन्य कोणि हे रहस्य ऐकू नये याची खात्री करण्यासाठी काळाग्नि निर्माण करून सर्व परिसर सजीव रहित केला आणि अमर कथा कथनाला सुरवात केली. पण योगायोगाने त्या मृगजीनाखाली एक अण्डे सुरक्षित राहून गेले होते आणि त्यातून जन्मलेली कबूतराची जोडी अमर झाली. अमरनाथची यात्रा करताना कबूतराची जोडी दिसल्याचे यात्रिक सांगतात.
एका कथेनुसार बूटा मलिक नावाच्या धनगराला भेटलेल्या साधूने कोळशाने भरलेली पिशवी दिली. घरी गेल्यावर कोळशा ऐवजी त्याची सोन्याची नाणी झालेली पाहून आनंदाने त्या साधूचे आभार मानयला गेल्यावर तो साधू न दिसता त्या जागी गुहा आणि शिवलिंग दिसले आणि हे तीर्थक्षेत्र झाले.
पुराणकथेनुसार कश्यप ऋषींनी काश्मीर खोऱ्यात भरलेले पाणी नद्यांमधून काढून टाकून तेथे वस्तीला योग्य केल्या नंतर भृगु ऋषी हिमालय दर्शनास आले आणि त्याना प्रथम अमरनाथ चे दर्शन झाले.
श्रावण महिन्यात (जुलै, ऑगस्टमध्ये) अमरनाथची यात्रा भरते. तीन दिवसांचा पायी प्रवास करून तेथे जाता येते. अमरनाथच्या गुहेमध्ये बर्फाचे शिवंलंग तयार होते. चंद्राच्या गतीनुसार त्याचा आकार कमी अधिक होतो. त्याचे शेजारी पार्वती माता आणि गणेश अशी दोन छोटी लिंगे बर्फात तयार होतात. त्याचे दर्शन घेण्यासाठी लक्षावधी लोक ही यात्रा करतात. जुलै-ऑगस्ट महिन्यानंतर अमरनाथच्या गुहेचे दार बंद करून ठेवले जाते. प्रतिकूल हवामानाचे दृष्टीने बरोबर गरम कपडे, छत्री , रेनकोट, नेहमी लागणारी औषधे ठेवणे आवश्यक. विमा उतरवणे हिताचे.

जायचे कसे?

जम्मू टूरिस्ट रिसेप्शन सेंटर, रघुनाथ चौक येथे फक्त पहाटे बसेस मिळतात. तेथून ३१५ कि.मी. वर पहेलगाम. पुढे चंदनवाडी १३, पिसू टॉप ३, शेषनाग ९, पंचतरणी १२, तेथून ६ कि.मी. अमरनाथ.
जम्मूहून  श्रीनगर, सोनमर्ग मार्गे बालताल ४०० कि.मी. तेथून डोमैल, बरारी मार्ग, संगम मार्गे फक्त १२ कि.मी. वर अमरनाथ आहे. एक दिवसात अमरनाथ दर्शन करून परत बालताल बेस कॅम्प  गाठता येतो. मात्र चंदनवाडी पेक्षा हा मार्ग अरूंद आणि खूप चढ उतार असलेला आहे.
 
Pravasi Vishva is a online version of the formally know publication, "Pravsi Diary" which has been published over last 40 Years. Containt published on Pravasi Vishva is copyrighted to Mr. Jayant Joshi and Pravasi Diary - Disclaimer
 
designed and developed by ideaclay